Latur केमिकलचा टँकर उलटला; केमिकलचा धुरामुळे सावधगिरी म्हणून गावकऱ्यांने केले स्थलांतर...
- MahaLive News
- Apr 19, 2023
- 1 min read

लातूर- महाLive Special Report: अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील वळणावर बुधवारी पहाटे ५ वाजता केमिकलचा टँकर पलटी झाला. यामध्ये टँकरची टाकी लीक झाल्यामुळे केमिकलचा धुर येत होता. सावधगिरी म्हणून नागरिकांना जुन्या कोपरा गावात तर काही जणांना शेतातील आखाड्यावर स्थलांतरीत करण्यात आले. MH 20 EG 8176 हा टँकर अहमदपूर मार्गे पुढे जात असताना किनगाव नजीक कोपरा वळणावर पलटी झाला. तो रस्त्याकडेच्या खड्यात पलटला.
यावेळी टाकी लीक होवून केमिकलचा धूर निघू लागला. त्याच्या उग्र वासाने गुदमरल्याचा त्रास जाणवू लागला. यामुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी तातडीने अहमदपूर, लातूर येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. पाणी मारून ते रसायन साफ करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. मात्र टँकरमधून धूर निघत असल्याने पोलीस प्रशासनाने सावध भूमिका घेत नागरिकांना स्थलांतरीत केले. या वळणावर वारंवार अपघात होत असून, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
Comments