अग्नितांडव थांबेना; ठाण्यातील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलला आग, ४ रुग्णांचा मृत्यू...
- MahaLive News
- Apr 28, 2021
- 1 min read

#ठाणे- कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले असताना रुग्णालयात होणाऱ्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. आता मुंब्रा शहरातील कौसा भागात असलेल्या हॉस्पिटमध्ये लागलेल्या आगीत ४ रुग्णांचा मृत्यू झालाय. प्राईम क्रिटीकेअर सेंटर या हॉस्पिटलमध्ये बुधवारी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी आग लागली. गेल्या सहा दिवसातील ही चौथी घटना आहे. रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार आग लागल्यांतर आयसीयूमधील ६ रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत होते. मात्र, त्याच दरम्यान ४ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये यास्मिन शेख (४६), नवाब शेख (४७), हलिमा सलमानी (७०), हरीश सोनवणे (५७) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सकाळी आग आटोक्यात आली असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली. ग लागली तेव्हा हॉस्पिटलमधील आयसीयू वार्डात ६ तर इतर वार्डात १४ रुग्ण होते. इतर रुग्णांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. यातील दोन रुग्णांची प्रकृत्ती गंभीर आहे. यातील रुग्णांना बिलाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तर काही रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. या प्रकरणी मुंब्रा पाेलीस अधिक तपास करत आहेत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज ठाणे
Kommentare