आज संध्याकाळपासून महाराष्ट्रात 144 कलम लागू; वाचा सविस्तर, काय सुरू काय बंद...
#मुंबई-मुख्यमंत्रीख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत साधला. महाराष्ट्रात उद्भवलेली कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनची शक्यता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलले. लसीकरणामुळे तिसरी लाट मंद होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आपण एकदा कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. पहिली लाट या लाटेसमोर लहान होती. या लाटेसमोर आरोग्य व्यवस्था कमी पडू लागली आहे. त्यामुळे आपण स्वस्थ बसलो नाही आहोत. या कोरोना लाटीवरही आपण विजय मिळवू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनावर गेल्या काही दिवसांमध्ये आपण नियंत्रण मिळवले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रसार वाढत आहे. आज जवळपास 60 हजार 212 रुग्णांची नोंद झाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक भार यंत्रणेवर पडत आहे. असेच होत गेल्यास यंत्रण कोलमडून पडले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी राज्यात लॉकडाउन लागणार की कडक निर्बंध लावण्यात येतील हे स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून आज लॉकडाऊनची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.राज्यात लॉकडाऊन लागू करावा असा सरकारमध्ये सूर आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीत लॉकडाऊन लागू करण्याबाबत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिला होता. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसार पर्याय नसल्याचे मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले होते.राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळेच आता राज्य सरकार राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. आज मुख्यमंत्री लॉकडाऊनसंदर्भात घोषणा करणार असतील. तर तो कसा असेल? कोणत्या गोष्टींना परवानगी असेल? काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार? या सर्व गोष्टींची उत्तरे नागरिकांना मिळतील.मुंबईतील परिस्थितीचा ठाकरेंकडून आढावाराज्यासह मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबईमधील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.कोरोनासंदर्भात टास्क फोर्ससोबत चर्चा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोरोना टास्क फोर्ससोबत कोरोना संकटावर बैठक घेतली होती. यामध्ये टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला होता. ठाकरेंनी सदस्यांची मते जाणून घेत लगेचच राज्याच्या सचिवांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व इतरही मंत्रीमंडळासोबत चर्चा केली होती.गर्दीच्या ठिकाणावर निर्बंध -लॉकडाऊन टाळायचा असेल तर मास्क घालावा, हात धुवावेत आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने करत आहेत. मात्र, नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही. परिणामी रुग्ण वाढत असल्याने बेड, व्हेंटिलेटर, आरोग्य सुविधांची कमतरता निर्माण होईल, अशी भीती टास्क फोर्सने वर्तवली आहे. त्यामुळे गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे.
@महालाईव्ह न्युज मुंबई
Commentaires