आमदार निधीतून १००० रेमडेसिवीर उस्मानाबाद जिल्ह्यात उपलब्ध…
#उस्मानाबाद- रेमडेसिवीर इंजेक्शनच्या १००० वायल्स आज जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा भासत होता. आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या आमदार निधीतून खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
तरी देखील जिल्हा प्रशासनाकडे कमी प्रमाणात वायल्स येत होत्या. या भूमिकेतून स्वतः पुढाकार घेऊन संबंधित वायल्स उपलब्ध करण्याचा निर्णय केला. या १००० वायल्समुळे जिल्ह्यातील रुग्णांसाठी पर्याप्त साठा उपलब्ध झाला आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज उस्मानाबाद
Comments