खेड तालुक्यातील रोलिंग स्टॉक कंपोनेंट्स फॅक्टरीमधील 40 कामगारांना कोरोनाची लागण...
- MahaLive News
- May 12, 2021
- 1 min read

#रत्नागिरी- खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथील लवेलमध्ये भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालय अंतर्गत सुरू असलेल्या कामातील रोलिंग स्टॉक कंपोनेंट्स फॅक्टरीमधील तब्बल 40 कामगारांना कोरोना झाला आहे. एकाच कंपनीतील 40 कर्मचाऱ्यांना कोरूना ची बाधा झाल्याने एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे.
या सर्व कामगारांना कंपनीच्या कॉलनीमध्ये अलगीकरण करून ठेवल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजन शेळके यांनी दिली आहे. परिसरात खेड, दापोली, मंडणगड आणि चिपळूण या तालुक्यातील हजारो कामगार कामाला येत असतात. त्याच्या कारणाने गेल्या वर्षी देखील लोटे हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. या वर्षीदेखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हाधिकाऱ्यानी सर्व कंपन्यांना आदेश दिले होते. त्यानुसार काही कंपन्यांनी या चाचण्या केल्या मात्र काही कंपन्यांनी अद्यापही या चाचण्यांना सुरुवात केली नसल्याचे दिसून येते.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज रत्नागिरी
Comments