देशातील पहिल्या साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ...
- MahaLive News
- May 14, 2021
- 1 min read

#उस्मानाबाद- देशातील पहिल्या साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या ऑनलाइन शुभारंभ आज दि.14 मे रोजी दु.1:30 वाजता मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते व्हॅर्च्यूअल मीटिंगद्वारे झाला. ‘जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख खासदास ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास दादा पाटील, आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकरी कौस्तुभ दिवेगावकर, मौज इंजिनिअरिंगचे ओक हे देखील व्हर्च्युअल मिटिंगव्दारे उपस्थित होते.

अशी माहिती धाराशीव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटिल यांनी दिली. धाराशिव साखर कारखान्यात देशातील पहिला इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला होता. फक्त 15 दिवसात रात्रंदिवस काम करून प्रकल्प उभारला आणि ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सर्व साखर कारखान्यांना ऑक्सीजन निर्मिती करण्याचे आवाहन केले होते. वाढत्या ऑक्सीजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सीजन निर्मितीची सुरुवात केली. या प्रकल्पात 20 टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याला लागणारा प्राणवायू पूर्ण क्षमतेने कोरोना बाधित रुग्णांना पुरवला जाणार आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज उस्मानाबाद
Comments