‘पीएम-किसान’ योजनेचा आठवा टप्पा; आज मोदींच्या हस्ते होणार १९ हजार कोटी रुपयांचे हस्तांतर
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम-किसान योजनेच्या आठव्या टप्प्याचे उद्घाटन करतील. या टप्प्यामध्ये १९ हजार कोटी रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (पीएम किसान) आजच्या टप्प्यातून ९.५ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान या रकमेचे हस्तांतर करतील. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवादही साधतील. तसेच, केंद्रीय कृषीमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. दोन-दोन हजार रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत एकूण १.१५ लाख कोटी रुपये शेतकरी कुटुंबांना देण्यात आले आहेत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज नवी दिल्ली
Комментарии