Search
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर इनोव्हाचा भीषण अपघात; दोन ठार, दोन जखमी...
- MahaLive News
- May 25, 2021
- 1 min read

#पुणे- पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या भरधाव इनोव्हा मोटारीचा भीषण अपघात झाला. मोटारीवरील ताबा सुटल्याने पुढे जात असलेल्या मालवाहू ट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली.

या भीषण अपघात दोन ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात गाडीचा पुढील भाग चेंदामेंदा झाला आहे. घटनास्थळी राणी अंबुलेन्स, महामार्ग पोलीस आणि देवदूत रेस्क्यू टीमने जखमींना गाडीबाहेर काढून सोमाटने फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज पुणे
Comments