पुण्याजवळील नसरापूर येथे वीज कोसळून दोन मुलींचा जागीच मृत्यू; एक जखमी...
- MahaLive News
- May 3, 2021
- 1 min read

#पुणे- शहराजवळील नसरापूर येथील कातकरी वस्तीजवळ खेळत असणाऱ्या दोन लहान मुलींवर वीज कोसळली, यात दोन्ही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाली आहे. नसरापूर येथील चेलाडी वस्तीवर रविवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. सीमा अरुण हिलम (वय 11), अनिता सिकंदर मोरे (वय 9) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. तर चांदणी प्रकाश जाधव ही मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोसाट्याचा वारा वाहत असताना या तिन्ही मुली घराजवळच खेळत होत्या. विजांचा कडकडाट होत असल्याने कुटुंबीयांनी या मुलींना लवकर घरात या असा आवाज दिला. परंतु या मुली घरात येत असतानाच विजेचा मोठा आवाज झाला. कुटुंबीयांनी बाहेर येऊन पाहिले असता या दोनही मुली खाली पडल्या होत्या. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज पुणे
Kommentarer