भाजपा चित्रपट कामगार आघाडी ठाणे जिल्हा यांच्या वतीने मोफत अन्नधान्य वाटप...

#ठाणे- गेल्या वर्षभर कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगाला ग्रासले आहे त्यातच लॉकडाऊनमुळे बरेचसे कामकाज ठप्प आहेत, अशातच चित्रपट कामगार तसेच संघटीत व असंघटीत कामगारांचे काम बंद असल्याने ते दुरावस्थेत असुन उपासमारीची वेळ आली आहे.

अशा परीस्थितीत भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा प्रभारी संजय रणदिवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली शहरातील 200 गरजू कलाकार व कामगार यांना भाजपा चित्रपट कामगार आघाडी ठाणे जिल्हा यांचे तर्फे मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा चित्रपट कामगार आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा प्रभारी संजय रणदिवे, महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख ज्ञानेश्वर काकड, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस वैभव जोशी, महाराष्ट्र प्रदेश सह सचिव ज्योतीताई भोईर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रुपाली निंबाळकर, प्रदेश सचिव निलेश राजे, ठाणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद नाईक,कल्याण तालुका सचिव मनिषा जोशी, सोनल भायाणी, ललिता सुतार, कल्याण तालुका उपाध्यक्षा धनश्री हजारे, कल्याण तालुका उपाध्यक्ष अमित ताम्हाणे, कल्याण शहर सरचिटणीस निशा शर्मा, कल्याण शहर उपाध्यक्ष महेश थोरात, सुशांत कदम,कल्याण शहर सचिव अनिल मोरे, डोंबिवली शहर अध्यक्ष विनय डांगे, डोंबिवली शहर खजिनदार दिपक नाईक असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज ठाणे
Comments