मनसेच्या वतीने कारेपूर येथे ५० बेडचे कोव्हीड सेंटर; या कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांना मेडिसिन मोफत...
#रेणापुर– मा.राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी कारेपुर ता.रेणापुर येथे ५०बेडचे कोवीड सेंटर उभे केले.
अहमदपुर,चाकुर आणि रेणापुर तालुक्यांच्या सिमेवर असलेल्या किनगांव -रेणापुर रस्त्यावरील उभारलेल्या कोवीड सेंटरचा शुभारंभ शुक्रवार ( ता.२१ ) रोजी रेणापुरचे तहसीलदार राहूल पाटील,मनसे जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाणे,रेणापुर ता.आरोग्य अधिकारी डॉ.एन.के. देशमुख,कारेपुर प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.मद्रे मॅडम,डॉ.सुनिल नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आले.कोवीड-१९ संसर्गाने देशात धुमाकुळ घातला असुन पहिल्या टप्प्यात शहरात मोठया प्रमाणात असलेला कोरोनाचा संसर्ग आता गाव,वस्ती तांडयावर पोहचला असुन दिवसेंदिवस संसर्ग संख्या वाढत आहे.ग्रामीण भागात अनेक जणांच्या घरी स्वतंत्र होम क्वांरटाईन होण्याकरिता पुरेशी जागा किंवा व्यवस्था होवु शकत नाही मग असे कोवीड पॉझीटीव्ह रुग्न गावभर लोकांत मिसळल्याने दिवसेंदिवस रूग्न संख्या झपाटयाने वाढत आहे. यामुळे संसर्ग वाढण्या बरोबरच मृत्युचे प्रमाणही वाढतांना दिसत आहे.कोरोना बाधीतांची व मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परिसरातील सर्वसामाण्य जनतेकरिता पदरमोड करुन कारेपुर येथे ५० बेडचे सर्व सोयी नियुक्त कोवीड सेंटर उभारले असुन या सेंटर मध्ये रुग्नाना सकाळी चहा नाष्ठा,दोन वेळेस जेवन,रहाण्याची उत्तम सोय, सकाळ – सध्याकाळ डॉक्टरांकडून तपासणी, रूग्नांकरिता लागणारी सर्व औषधी आगदी मोफत देण्यात येणार आहे.गंभीर रुग्नांच्या पुढील उपचाराकरिता मोफत रूग्न वाहिकेची सुविधाही २४ तास सेंटरवर उपलब्ध करण्यात आली आहे. तरी परिसरातील कोरोना बाधीत रूग्नांनी आपली,आपल्या,कुंटूबांची व आपल्या गाव परिसरातुन कोरोनाला हरविण्याकरिता सेंटर मध्ये दाखल येण्याचे अवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. सेंटर उभारणी करिता केंद्रे अॅग्रो प्रोडक्टचे चेअरमन विजय केंद्रे यांनी सेंटर उभारणी करिता विनामुल्य जागा उपलब्ध करून दिली.तर डॉ प्रमोद घुगे यांनी वैद्यकीय साहित्य व औषधी उपलब्ध करुन दिली.तर मनसेचे लातूर जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाने यांनी २१ हजार रुपयाचे आर्थिक साह्य केले. तर रवी गाडे व ज्ञानेश्वर जगदाळे यांनीही औषधी उपलब्द करून दिली.रेणापुरचे तहसीलदार राहूल पाटील यांनी शासकिय पातळीवरून लागणारी सर्व मदत करण्याचे तर ता.आरोग्य अधिकारी डॉ.एन.के. देशमुख यांनी आरोग्य विभागाकडून सर्वातोपरी मदत करण्यात येईल असे यावेळी सांगितले. या सेटर उभारणी करिता भागवत शिंदे ,रवि सुर्यवंशी,मनोज अभंगे ,बाळासाहेब मुंडे,इम्रान मणियार,भागवत कांदे,ज्ञानेश्वर जगदाळे,अँड. केशव फुंदे,वाहीद शेख,ऋषिकेश माने,ओम चव्हाण,नरसिंह भताणे,चेतण चौहाण,गोकुळ बदने,प्रमोद अंबेकर.राजु काळे,बाळासाहेब भताणे,शुभम डोंगरे,दौलत मुंडे,अंगद खलंग्रे,राम नागरगोजे,रवि गाडे,माणिक सिरसाट,शिवराज सिरसाट,चंदु केंद्रे,वजीर शेख,गौस शेख,असिफ शेख,बिभीशण जाधव.लिंबराज जाधव,धनराज लांडगे,धनराज सिरसाट,गोविंद केंद्रे,जावेद शेखआदिंनी सेंटर उभारणी करिता मोलाचे सहकार्य केले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज रेणापुर
Commentaires