लातूरात कोरोनाचे तांडव; जिल्यात विक्रमी आकडा, ८०४ जणांना कोरोनाची लागण; ३६३३२ पॉसिटीव्ह रूग्ण...
#लातूर- जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १५२५ आरटीपीसीआर चाचणी व १२७१ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन ८०४ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ३६ हजार ३३२ झाली आहे. आणि, आज ५ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन ८०४ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ३६ हजार ३३२ झाली. आतापर्यंत २९ हजार ५७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण ५९७९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील २९४ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील १२६९ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील ३८१ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ४०३५ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण ५९७९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - १५२५
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - १२७१
आजचे रूग्ण - ८०४
एकुण रूग्ण - ३६३३२
बरे झालेले रूग्ण - २९५७३
ऍक्टिव्ह रुग्ण - ५९७९
आजचे मृत्यू - ५
एकुण मृत्यू - ७८०
@महालाईव्ह न्यूज लातूर
Коментарі