top of page
Search
Writer's pictureMahaLive News

लातूरकरांनो काळजी घ्या; जिल्ह्यात १३०३ जणांना कोरोनाची लागण; ६७८३९ पॉसिटीव्ह रुग्ण...


#लातूर- जिल्ह्यात मंगळवारी एकूण ८३६ आरटीपीसीआर चाचणी व २६१० रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १३०३ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ६७ हजार ८३९ झाली आहे. आणि, आज ३० मृत्यूची नोंद झाली आहे. त्याचा तपशील पढुीलप्रमाणे आहे. या नवीन १३०३ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ६७ हजार ८३९ झाली. आतापर्यंत ५२ हजार ४५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण १४२०२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ७६८ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील १४४५ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील २१५१ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ९८३८ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण १४२०२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

लातूर कोरोना मीटर

आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - ८३६

आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - २६१०

आजचे रूग्ण - १३०३

एकुण रूग्ण - ६७८३९

बरे झालेले रूग्ण - ५२४५१

ऍक्टिव्ह रुग्ण - १४२०२

आजचे मृत्यू - ३०

एकुण मृत्यू - ११८६


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...

@महालाईव्ह न्यूज लातूर

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Mahalive Special Report
Play Video
bottom of page