लातूरकरांनो काळजी घ्या; जिल्ह्यात ३८ जणांचा मृत्यू तर १२६९ जणांना कोरोनाची लागण; ६११४१ पॉसिटीव्ह...
#लातूर- जिल्ह्यात गुरुवारी एकूण १६४२ आरटीपीसीआर चाचणी व ३२५५ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १२६९ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ६१ हजार १४१ झाली आहे. आणि, आज ३८ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन १२६९ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ६१ हजार १४१ झाली. आतापर्यंत ४३ हजार ९६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १०५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण १६१२७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ७९२ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील १९५० ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील १६९० ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ११६९५ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण १६१२७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - १६४२
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - ३२५५
आजचे रूग्ण - १२६९
एकुण रूग्ण - ६११४१
बरे झालेले रूग्ण - ४३९६०
ऍक्टिव्ह रुग्ण - १६१२७
आजचे मृत्यू - ३८
एकुण मृत्यू - १०५४
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments