लातूरमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढी समोर खाटांची संख्या अपुरी; संभाजी पाटील निलंगेकर...
- MahaLive News
- Apr 20, 2021
- 1 min read

#लातूर- दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. रुग्णांची संख्या पाहता खाटांची संख्या अपुरी पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यात आणखी खाटा वाढवण्याची मागणी केली जात आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्याच्या ठिकाणी ५०० खाटांचे तर जिल्ह्यातील दहा तालुक्याच्या ठिकाणी २०० खाटांचे जंम्बो कोवीड सेंटर त्याचबरोबर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनची तात्काळ उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून यामध्ये दोन दिवसांपासून मृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे. अनेक रुग्णांना उपचारासाठी खाट मिळत नसून आवश्यक असणारा औषधोपचारही मिळण्यास अडचण येत आहे. ही बाब लक्षात घेऊनच लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी दोनशे खाटांचे तर जिल्ह्याच्या ठिकाणी पाचशे खाटांचे जंम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूरी देऊन निधीची तरतूद करावी, अशी मागणी आ. निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या लक्षात घेता रेमडिसीवर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात असून सदर इंजेक्शनची उपलब्धता मागणीच्या समप्रमाणात होताना दिसत नाही. रुग्ण जास्त होत असल्याने वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याने तत्काळ यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी होताना दिसत आहे.
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments