Search
लोहाऱ्यात मोकाट फिरणाऱ्याची अन्टीजेन तपासणी करुन दंडात्मक कारवाई...
- MahaLive News
- May 12, 2021
- 1 min read

#उस्मानाबाद- लोहारा शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या लोकांची कोरोना अन्टीजेन तपासणी करुन दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी 66 लोकांची अन्टीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये 66 तपासणी पैकी एकुण 3 पाॅझेटिव्ह कोरोना रुग्ण निघाले.
प्रशासनाने अन्टीजेन तपासणी करुन दंडात्मक कारवाई केल्यामुळे मोकाट फिरणाऱ्यांना चाप बसणार आहे. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी अशोक कठारे, सहायक पोलिस निरीक्षक वाटोडे, नायब तहसिलदार दिगंबर स्वामी, महसुल सहायक भागवत गायकवाड, वजिर अत्तार, तलाठी समाधान माळी, यांच्यासह अरोग्य विभाग सेवक, महसुल प्रशासन, पोलीस कर्मचारी उस्थित होते.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज उस्मानाबाद
Comments