वीकेंड लॉकडाऊन; लातूर शहरात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर कारवाई...

#लातूर- करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यासाठी काल रात्री ८ वाजल्यापासून लॉकडाऊनचे पालन करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही मॉर्निंग वॉकच्या नावाखाली नागरिकांचा रस्त्यावर राबता असल्याचे आज पाहायला मिळाले. लातूरच्या शहरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. महाराष्ट्र सरकारने शनिवार व रविवार दोन दिवसाचा लॉक डाऊन जाहीर केला. त्या अनुषंगाने राज्यात सर्वत्र या आदेशाचे पालन करण्यात येत आहे. मात्र लातूर शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांवर लातूर शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. सकाळी 17 हजार रुपये दंड वसूल केला आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांना संदेश देण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments