विरारच्या घटनेची पंतप्रधान मोदींकडून दखल; मृतांच्या व जखमींच्या नातेवाईकांना मदत जाहीर...
#मुंबई- दोन दिवसांपूर्वीची नाशिकची ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता वसईच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अशी प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील वसईच्या कोविड सेंटरमध्ये ही आग लागली आहे. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत १२ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आज मध्यरात्री ३ ते ३.३० च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्ण उपचार घेत होते. यातील १३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेची दखल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे. तसेच पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख, जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. याची अध्कृत माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून ट्वीट करून देण्यात आलेली आहे.
तसेच या घटनेवर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळल्याने मृत्यू ओढवला. ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत.’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी माहिती हि दिली आहे.
@महालाईव्ह न्युज मुंबई
Commentaires