सर्व विभागांनी आपत्कालीन प्रतिसाद कार्यपद्धती अद्यावत करण्याचे निर्देश…

#लातूर- सर्व विभागांनी आपत्तीकालीन प्रतिसाद कार्यपद्धती अद्यावत करावी, यामध्ये आपत्तीकालीन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात यावा, आपत्ती व्यवस्थापन समिती आपल्या विभागातील तसेच अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच आपल्याकडील उपलब्ध साहित्य सामग्री वाहन क्रमांक इत्यादीची माहिती समाविष्ट करून दि. 25 मे 2021 रोजी या कार्यालयास सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सून 2021 पूर्वतयारीबाबत च्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सोळंके व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज पुढे म्हणाले : मान्सून पूर्वतयारीसाठी ज्या विभागांना देखभाल दुरुस्तीसाठी व साहित्य खरेदीसाठी निधीची आवश्यकता असेल तर त्या विभागांनी एस.डी. आर. एफ. अंतर्गत निधी मागणीचे प्रस्ताव 25 मे 2021 पर्यंत सादर करावेत. यावर्षी हवामान विभागाच्या अंदाजानुसार सरासरीइतका पाऊस पडणार आहे. तरी सर्व विभागाने मागील मागील अतिवृष्टी व पुरात केलेल्या कामकाजात अधिक सुधारणा करून प्रत्येक विभागाने अत्यंत दक्ष पणे सोपवलेली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले. सर्व उपविभागीय अधिकारी यांनी उपविभाग तर तहसीलदार यांनी तहसील स्तरावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना सूचना द्याव्यात. तसेच प्रत्येक विभागाने आपल्या विभागाचे नियंत्रण कक्ष 24 तास चालू राहतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच आपत्तीच्या अनुषंगाने सर्व माहिती अद्यावत ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी केले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here… @महालाईव्ह न्यूज लातूर
コメント