सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेणार; चंद्रकांत पाटील...
सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या दुदैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेणे आवश्यक ठरले आहे. त्यासाठी उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समिती स्थापनेचा आणि कार्यकक्षेचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याची माहिती दिली.
Comments