१ मे पासून स्वस्त धान्य दुकान बंदचा इशारा; जाणून घ्या कारण...
- MahaLive News
- Apr 29, 2021
- 1 min read

#औरंगाबाद- शिधापत्रीका धारकाचा अंगठा न घेता माल वितरणास परवानगी द्यावी, अन्यथा दि.१ मे पासून धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतला आहे. या प्रकरणी आदर्श रेशन दुकानदार वेलफेअर असोसिएशनने वैजापूर तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक स्वस्त धान्य दुकानदार दगावले आहेत. नाशिक जिल्ह्यात तर स्वस्त धान्य दुकानदाराच्या कुटूंबातील पाच जण दगावल्याची घटना आहे. शिधापत्रीका धारकांचे अंगठे इ पास मशीनवर घेतल्यानंतर दूकानदारालाही आपला अंगठा मशीनवर द्यावा लागतो. त्यामुळे दुकानदाराचा अनेक जणांशी संपर्क होतो. अनेकांशी संपर्क आल्याने कोरोना फैलाव व दुकानदाराला ही संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नाही. यामुळे शिधापत्रिका धारकांचे अंगठे न घेता केवळ दुकानदाराचा अंगठा आधी प्रमाणीत करून माल वाटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार यांनी केली आहे. या बाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. मात्र, अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे केवळ दुकानदाराच्या अंगठ्यावर माल वाटपाची परवानगी द्यावी, अन्यथा दि.१ मे पासून दुकान बंद ठेवून इ-पास मशीन तहसिल कार्यालयात जमा करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज औरंगाबाद
Comentarios